चीनच्या अफाट प्रगतीचा नायक

Posted: ऑक्टोबर 4, 2009 in आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण
शिरीष सप्रे, सौजन्य – म टा

चिनी प्रजासत्ताकाचा साठावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. तीस वर्षांपूवीर् मागास असलेला हा देश आज अमेरिकेशी टक्कर देऊ पाहतो आहे. यामागच्या रहस्याची चीनला भेट देऊन केलेली उकल…
……………

नुकताच मी व माझे दोन सहकारी मित्र काही मशिनरी व कारखाने पाहण्याच्या निजमत्ताने चीनचा २० दिवसांचा दौरा करून आलो. पहिले चार-पाच दिवस कामासाठी व नंतरचे पंधरा सोळा दिवस चीनच्या विविध भागांमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने भटकंती केली. परत आल्यानंतर अलीकडेच चीनच्या प्रवासवर्णनाचा एक लेख वाचनात आला. त्या लेखिकेने लिहिले होते की ‘मी शांघायला विमानातून उतरल्यानंतर चीनची प्रगती पाहून जो आ केला तो परतीच्या विमानात बसल्यानंतरच मिटला’. आमचीही परिस्थिती अशीच झाली. किंबहुना चीनच्या चकित करणाऱ्या प्रगतीच्या प्रभावातून आजही आम्ही बाहेर येऊ शकलेलो नाही.

जो देश तीस वर्षांपूवीर् बाहेरच्या जगापासून पूर्णपणे बंदिस्त होता. खाकी कपडे व सायकली याशिवाय या अतिप्रचंड लोकसंख्येकडे काहीही नव्हते. संपूर्ण भूप्रदेशाच्या दोन तृतियांश भूभाग हा अति डोंगराळ व वाळवंटी. चिनी भाषेशिवाय अन्य भाषेचा गंध नसलेला हा देश तोंडात बोटे घालायला लावण्याएवढी प्रगती कशी करू शकला? लक्षात आले की सन १९७९पासून त्या देशाला मिळालेले नेतृत्वच या प्रगतीला जबाबदार आहे.

डेंग शिआवो पेंग यांच्या रूपाने चीनला १९७९ साली सवोर्च्च सत्ता हाती असलेला एक दष्टा नेता मिळाला. या दूरदृष्टीच्या नेत्याने अक्षरश: एक हाती प्रगती करून दाखवली. चाऊ एन लाई हे १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला कर्करोगाने आजारी पडले व त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून डेंग यांची निवड केली. या संधीचा फायदा घेऊन डेंग यांनी देशाची आथिर्क घडी बसविण्यावर आपले लक्ष केंदित केले व या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९७६च्या जानेवारी महिन्यात चाऊ एन लाई कर्करोगाबरोबरची लढाई हरले व त्यानंतर लगेचच माओंनी डेंग यांचा वाढता प्रभाव पाहून त्यांच्याऐवजी हुओ गुओफेन्ग यांची चाऊ एन लाई यांचा उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. डेंग यांचे पक्षाच्या सदस्यत्वाशिवायचे सर्व अधिकार काढून घेतले; पण त्याच वषीर् माओ यांचेही वयाच्या ८३ व्या वषीर् निधन झाले.

माओ यांच्या निधनानंतर लगेचच डेंग हळूहळू चीनचे सर्वात प्रभावी नेते म्हणून गणले जाऊ लागले. चायनिज कम्युनिस्ट पाटीर्मध्ये जाणीवपूर्वक आपल्या सहकाऱ्यांना गतिशील करून डेंग यांनी हुओ गुओफेन्ग या माओंनी नेमलेल्या उत्तराधिकाऱ्याची १९८० साली गच्छंती केली. त्या दरम्यान माओनी सुरू केलेल्या ‘सांस्कृतिक क्रांती’चा डेंग यांनी पूर्णपणे अस्वीकार केला व ‘बीजिंग स्प्रिंग’ची सुरुवात केली. पक्षावरच्या आपल्या नियंत्रणानंतर डेंग यांनी कामगार-मालक अशी वर्गाची पार्श्वभूमी नाहीशी करण्यासाठी चालना दिली व त्यामुळे चीनमधील भांडवलदार कम्युनिस्ट पाटीर्त सामील होऊ शकले.

स्वत: डेंग यांनी सर्वात प्रभावी नेता म्हणून चायनिज कम्युनीस्ट पाटीर्वर प्रभुत्व ठेवले. पक्षाने धोरण ठरवायचे व सरकारने त्याची अंमलबजावणी करायची, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे नेते काम करतील की ज्यामुळे व्यक्तीपूजेला स्थान राहणार नाही अशी व्यवस्था केली. यातूनच त्यांनी माओवादी ‘वर्ग संघर्ष’ मानणाऱ्या दुराग्रहींची फळी मोडून काढली.

डेंग यांच्या दिशानिदेर्शाप्रमाणे पाश्चिमात्य देश व अमेरिका यांच्याबरोबरच्या चीनच्या संबंधामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. डेंग यांनी पाश्चिमात्य देशांचे बरेच दौरे केले व सौहार्दपूर्ण चर्चा केल्या. १९७९ साली अमेरिकेचा दौरा करणारे डेंग हे चीनचे पहिले नेते ठरले. जिमी कार्टर यांच्याबरोबरच्या करारानुसार अमेरिकेने तैवानबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून चीनबरोबर संबंध जोडले. दुसऱ्या महायुद्धापासून जपानबरोबरचे बिघडलेले संबंध डेंग यांनी सुधारले. डेंग यांनी जपानकडे जलद सुधारणा करून आथिर्क सत्ता प्रस्थापित करणारे एक आदर्श राष्ट्र या दृष्टीने पाहिले व चीनच्या विकासासाठी जपानचा कित्ता गिरविण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांना चीनमध्ये आमंत्रित केले. तंत्रज्ञान, कौशल्य, व्यवस्थापन, संगणकीकरण, आराखडा शास्त्र, प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स् व प्रशिक्षित मनुष्यबळ, तंत्रज्ञान हस्तांतरण यासह विदेशी भांडवल उभारणी यासाठी चीनचे दरवाजे जगासाठी खुले केले. आथिर्क उदारीकरणाचे धोरण ठरल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याची परिणामकारक अंमलबजावणी सुरू केली.

राजकीय क्षेत्रामध्ये डेंग यांनी १९ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंडबरोबर यशस्वी करार करून हाँगकाँगमधील ब्रिटिश राजवट १९९७मध्ये संपवून चीनमध्ये विलिनीकरण तसेच पोर्तुगालबरोबर अशाच प्रकारच्या करारान्वये मकाऊ कॉलनी पुन्हा चीनच्या ताब्यात मिळवली. ‘एक राष्ट्र, दोन पद्धती’ अशी नवी क्रांतिकारी संज्ञा देऊन त्यांनी हाँगकाँग व मकाऊची भांडवलशाही व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. चीनची आथिर्क धोरणे ठरवताना डेंग यांनी जो प्रागतिक व व्यवहारवादी दृष्टिकोन समोर ठेवला त्याबद्दलची त्यांची काही प्रसिद्ध धोरणे, तत्त्वे व वक्तव्ये अशी होती- १. चीनच्या प्रचंड लोकसंख्येवर बंधन घालण्यासाठी डेंग यांनी ‘एक कुटुंब-एक अपत्य’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविली. त्यासाठी सक्ती, अनुदाने व दंडाचा वापर केला. त्यामुळे १.८ टक्क्यापर्यंत गेलेला लोकसंख्या वाढीचा दर २००९ साली ०.६ टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे. २. डेंग यांनी सुधारणा व उदारीकरण ही संज्ञा लोकप्रिय केली. त्याचा अर्थ आथिर्क उदारीकरण व त्याअनुषंगाने सामाजिक, राजकीय, कायदेशीर व सांस्कृतिक सुधारणा. ३. चीनच्या सर्वांगीण प्रगतीची उद्दिष्टे ठरवताना डेंगनी चार गोष्टींच्या अत्याधुनिकतेवर सर्वाधिक भर दिला. अ) शेती ब) उद्योग व व्यापार क) विज्ञान व तंत्रज्ञान ड) लष्करी सेना. या क्षेत्रांचे आधुनिकीकरण करताना त्यांनी दोन महत्त्वाची सूत्रे ठरवून दिली- अ) चीनचा वैशिष्ट्यपूर्ण समाजवाद आणि ब) वस्तुस्थितीमधून सत्य शोधणे. यामुळे आथिर्क निर्णय घेताना तत्त्वज्ञानाच्या (ढ्ढस्त्रद्गश्ाद्यश्ाद्द४) पगडयातून बाहेर पडता आले व परिणामकारकता सिद्ध झालेलीच धोरणे ठरवणे साध्य होऊ शकले. डेंग यांनी ‘समाजवाद म्हणजे निव्वळ गरिबीचे वाटप’ असे असता कामा नये असे नमूद केले. ४. नियोजन व बाजारपेठेचा दबाव (रूड्डह्मद्मद्गह्ल स्नश्ाह्मष्द्गह्य) ही अनुक्रमे समाजवादी व भांडवलशाही व्यवस्थेमधील मूलभूत सूत्रे आहेत असे मानता कामा नये हे डेंग यानी ठासून सांगितले. नियोजन आणि बाजारपेठेचा दबाव यांची आथिर्क उलाढालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते असे डेंग यांचे मत होते. ५. ‘श्रीमंती ही वैभवशाली असते (ञ्जश्ा ड्ढद्ग ह्मद्बष्द्ध द्बह्य त्नद्यश्ाह्मद्बश्ाह्वह्य) ही डेंग यांची परवलीची व वारंवार वापरली जाणारी घोषणा होती. या त्यांच्या परिणामकारक घोषणा, संज्ञा व धोरणांच्यामुळे चीनमध्ये वैयक्तिक उद्यमशीलतेची लाटच आली आणि त्यामुळे चीन हे जगातील सर्वात जलद आथिर्क उन्नत्ती करणारे राष्ट्र म्हणून उदयाला आले.

चीनच्या आथिर्क, सामाजिक, राजकीय व भौगोलिक परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास व त्याला योग्य असे निर्णय ही डेंग यांची खासियत होती. त्यानी कुठल्याही धोरणांचे अंधानुकरण केले नाही. त्यावेळच्या रशियन सोविएत संघ राज्य (स्स्क्र) या साम्यवादी देशामध्ये पुनर्बांधणी (क्कद्गह्मद्गह्यह्लह्मश्ाद्बद्मड्ड) आणि प्रसिध्दी व उदारीकरण (त्नद्यड्डह्यठ्ठश्ाह्यह्ल) या धोरणांची मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी वरून खाली (ञ्जश्ाश्च ह्लश्ा क्चश्ाह्लह्लश्ाद्व) या तत्त्वाने सर्व निर्णय स्वत: घेऊन अंमलबजावणी सुरू केली. उलट डेंग यांनी चीनमधील सुधारणा खालून वर (क्चश्ाह्लह्लश्ाद्व ह्लश्ा ञ्जश्ाश्च) या तत्त्वाने चालू ठेवल्या. चीनमध्ये ज्या ज्या ठिकाणी चांगली कामे चाललेली होती त्यातील आदर्श कामांची डेंग यांनी इतर ठिकाणी अंमलबजावणी सुरू केली व त्यासाठी विविध परगण्यांतील प्रशासनाना उद्युक्त केले. त्यांनी राबविलेल्या यशस्वी, खात्रीलायक अशा आथिर्क व समाज उपयोगी सुधारणा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात व शेवटी देशस्तरावर राबविण्याचा सपाटा लावला. निर्यात वाढवण्यासाठी डेंग यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी जगभर दौरे केले. जपान व पश्चिमी राष्ट्रांकडून अत्याधुनिक यंत्रसामुग्री आयात केली. विशेष आथिर्क क्षेत्र (स्श्चद्गष्द्बड्डद्य श्वष्श्ाठ्ठश्ाद्वद्बष् र्ंश्ाठ्ठद्ग-र्च्स्श्वंज्) ही संकल्पना लोकप्रिय केली की ज्यामुळे थेट परकीय गुंतवणूक व बाजारपेठांच्या उदारीकरणाला उत्तेजन मिळाले.

चीनच्या प्रचंड जनसंख्येची क्रयशक्ती वाढवण्यासाठी शेतीमाल व उत्पादने यांच्या देशांतर्गत गरजेपेक्षा अधिक उत्पादन हे खुल्या बाजारपेठेत विकण्याची परवानगी देण्यात आली. या धोरणामुळे फक्त शेतीचेच उत्पादन न वाढता औद्योगिक उत्पादनामध्येही प्रचंड वाढ झाली व पर्यायाने जनतेची क्रयशक्ती वाढीस लागली

डेंग यांच्या आथिर्क उदारीकरणाच्या धोरणांमुळे चीनच्या किनारपट्टीजवळील भागाचा आश्चर्यकारक विकास झाला. डेंग नेहमी म्हणत असत की चीनसारख्या प्रचंंड देशामध्ये (क्षेत्रफळ व लोकसंख्या) प्रथम काही विशिष्ट भागांचा विकास होईल. त्यामुळे ‘गोल्डन ट्रँगल’, शांघाय व पुुडांग हे भाग सर्वप्रथम विकसित झाले व त्यानंतर इतर भाग विकसित होत गेले आणि ३० वर्षांच्या काळात चीन हे जगातील सर्वात जास्त प्रगती करणारे राष्ट्र ठरले.

डेंग यांची दूरदृष्टी व प्रचंड क्षमतेच्या पायाभूत व इतर क्षेत्रातील योजना व महाकाय प्रकल्प यांची आम्ही काही प्रत्यक्ष पाहिलेली उदाहरणे :- १. थ्री गॉजेर्स धरण – या धरणाची प्रत्यक्ष उभारणी १९९२ साली सुरू झाली. या प्रकल्पावर आत्तापर्यंत एक लाख ४० हजार कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. चीनच्या नैऋत्येला तिबेटमध्ये उगम पावून मध्यचीन व शेवटी चीनच्या पूवेर्ला शांघायजवळ ६३८० कि.मी.चा प्रवास करून ईस्ट चायना समुदाला मिळणाऱ्या यांगत्सी या जगातील चार नंबरच्या नदीवर बांधलेले हे धरण चीनच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरले. जलवाहतूक, जलपर्यटन, सिंचन व जलऊर्जा निमिर्तीचे जगातील सर्वात मोठे धरण अशी ख्याती या धरणाने मिळवली. या धरणातून सध्या १८२०० मेगावॅट ऊर्जा तयार केली जाते व आगामी दोन वर्षात आणखी ४२०० मेगावॅट ऊर्जा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहतुकीसाठी प्रवाहाच्या बाजूने येणाऱ्या मोठ्या बोटी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणाच्या खालच्या प्रवाहामध्ये व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोटी धरणाच्या खालच्या प्रवाहातून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यासाठी पाच टप्प्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाची सुरुवात डेंग यांच्या काळातच झालेली आहे.

२. रस्ते विकास, रेल्वे, भुयारी रेल्वे, बोगदे, पूल, इमारती, औद्योगिक क्षेत्रे, ऊर्जा प्रकल्प, बंदरे, विमानतळ या सर्वांच्या प्रचंड क्षमतेच्या बांधकामाची सुरुवातही डेंग यांच्या काळातच झाली व अजूनही त्याच किंबहुना अधिक वेगाने चालू आहे.

३. ‘गोल्डन ट्रँगल’, शांघायचा कायापालट व चीनला व्यापारी केंद म्हणून विकसित करताना जिथेे फक्त भातशेती होती अशा पुडाँग या भागाला चीनचे ‘मॅनहॅटन’ बनवले गेले.

४. बीजिंगचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण करण्यात आले की ज्यायोगे चीनची राजधानी म्हणून एक अत्याधुनिक शहर, जे पुढे २००८ सालच्या ऑलिंपिक स्पधेर्साठी योग्य ठरू शकले. ही काही नमुन्यादाखल उदाहरणे आहेत. याव्यतिरिक्त संपूर्ण चीनमधील कित्येक शहरे व परगणे अशाच प्रकारे विकसित करण्यात आले; ज्यामध्ये चुआंगचिंग, तिआनजीन, शेन्झेन, बिश्केफ अशा अनेक शहरांची नावे सांगता येतील.

डेंग यांनी १९८९ साली सवोर्च्च पदावरून पायउतार व्हायचे ठरवले व १९९२ साली सक्रिय राजकारणातून त्यांनी संन्यास घेतला. तथापि, चीन डेंग यांच्या कालखंडाच्या प्रभावातच राहिला. आयुष्यभर सत्ता व पद सोडायचे नाही हा दंडक मोडून डेंग यांनी चीनच्या राजकारणात आदर्श पायंडा पाडला. १९ फेब्रुवारी १९९७ या दिवशी, वयाच्या ९२व्या वषीर् डेंग यांचे निधन झाले. त्यांचे उत्तराधिकारी झियांग झेमीन यांच्या हाती सत्तासूत्रे घट्टपणे होती पण सरकारी धोरणांच्यावर डेंग यांच्या पश्चातही त्यांच्याच राजकीय व आथिर्क तत्त्वज्ञानाचा प्रभाव राहिला.

डेंग यांचा चीनला मिळालेला वारसा थोडक्यात सांगायचा झाला तर असे म्हणता येईल की ‘डेंग यांनी चीन हा देश की जो मोठ्या राजकीय चळवळींच्या जोखडात अडकलेला होता, त्या देशाला आथिर्क पुनर्बांधणीकडे वळवले. गेल्या तीन दशकांतील चीनच्या नेत्रदीपक व सार्थ प्रगतीचे श्रेय हे डेंग यांच्या धोरणांना जाते. डेंग यांच्या धोरणांमुळेच मनुष्यजातीच्या इतिहासातील एक सर्वात यशस्वी औद्योगिकीकरण म्हणून चीनकडे बघता येईल. तीस वर्षांच्या अगदी काळात एका शेतकरी समाजाला डेंग यांच्यामुळे औद्योगिक महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर ओळखले जाऊ लागले व त्या देशाचे ढोबळ उत्पन्न हे अमेरिकेसारख्या बलाढ्य आथिर्क महासत्तेच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे. अशा या उत्तुंग नेतृत्वाला चीनमधील लोक चीनच्या अफाट प्रगतीचा नायक मानतात.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s