शिवरायांचे शिक्षण कोणी केले?

Posted: ऑगस्ट 29, 2010 in इतिहास
टॅगस्, ,

जयसिंगराव पवार , सकाळ, २० जुन, २००९

खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच “बालभारती’तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा “शिवरायांचे गुरू’ म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे “शिक्षक’ म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.” (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील “समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय’ साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.” (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये “शिवाजीची साक्षरता’ या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून “आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.

प्रतिक्रिया
 1. हेरंब म्हणतो आहे:

  जयसिंग पवार या माणसावर माझा मुळीच विश्वास नाही. निदान इतिहासकार म्हणून तरी नाहीच नाही.

  >>”पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले”

  आधी असा अर्धवट अभ्यास केल्याचे सांगून नंतर वारा वाहील तशी पाठ फिरवणाऱ्या माणसाने स्वतःला इतिहासकार म्हणवून घेणं हीच मोठी हास्यास्पद गोष्ट आहे.

  • दीपक म्हणतो आहे:

   जयसिंगराव पवार हे विश्वासार्ह आहेत की नाही… यांवरुन दादोजी हे शिवरायांचे गुरु होते अथवा नाही हे सिद्ध होत नाही.

   दादोजी शिवरायांचे गुरु होते असे ठामपणे म्हणण्यासारखा एकही ऐतिहासिक पुरावा आज उपलब्ध नाही. मग असे असताना त्यांना गुरु ठरवण्याचा अट्टाहास कशासाठी करायचा ?

 2. vijaybuddhisagar म्हणतो आहे:

  I liked this!!!!!!!

  I am not even remotely connected with this.Since I am Hindu I have to take birth in some cast .Your argument is correct and can be taken for granted at least to avoid this politics.
  From the available documents it is never seen that ShivajiRaje was against any cast, he has punished the traitors irrespective of their cast may be more marathas .

  Why these people who are dabbling in this politics follow ShivajiRaje in treating all the casts at same level and convert wherever willing to their earlier casts like Netaji Palkar

 3. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर ते अफजलचे ‘गुरु’ होते. हे देखील पुस्तकात टाकून द्या. अजून शिवाजी महाराज आणि अफजल खान दोस्त होते. अफजल खानचा वध शिवाजी महाराजांनी केला नसून अफजल खान हृदयविकाराच्या झटक्याने गेला. हे देखील इतिहासाच्या पुस्तकात टाका.

  • दीपक म्हणतो आहे:

   ज्यांचा दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते, असा दावा आहे त्यांनी त्याच्या पुष्टीसाठी तसे पुरावे सादर करावेत. मागे मेहेंदळे, बलकवडे, बेडेकर इ. इतिहासकारांनी दादोजी हेच शिवरायांचे गुरु असा दावा केला. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र पत्रकार परिषदेत त्याच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा सादर केला नाही.

 4. varsha म्हणतो आहे:

  je satya aahe te aaj pudhe aale…….

 5. vijay म्हणतो आहे:

  अफजलखानाचा ’कोथळा’ काढला, हे पुस्तकात आहे का ?

  लालमहालात ’तानाजी आणी ….. च्या मुला-मुलीचा विवाहाची बतावणी करुन राजे लाल महालात शिरले, हे आहे का ?

  महाराज आग्रावरुन पेटा-यातुन पळुन गेले, याचाही पुरावा नाहि, म्हणतात, मग ?

  इतिहास हा जेत्यांचा शिकवायचा असतो, इंग्रजांनी किंवा नेहरुंनी लिहिलेला नव्हे. शिवाजी केवळ एक राजा म्हणुन शिकवायला नको, तर ते महान होते, हे शिकवायला हवे.

  गुरु केवळ शिकवतो, म्हणुनच होत नाही. आणि इतिहास वस्तुनिष्ठतेने शिकवायचा तो वरच्या वर्गाला…

 6. amol म्हणतो आहे:

  शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते की आणखी कोण होते हा वाद मुळी नावाचा नाहीए, हा वाद जातीय स्वरुपाचा आहे, अगदी शिवकालापासुन ते आत्तापर्यंत मराठा समाजाची सत्ता महाराष्ट्रात आहे, ती पुढेही बदलण्याची श्क्यता नाही, या काळातच इतिहास लिहीला गेला, त्या त्या वेळी घडलेल्या घटनांची नोंद करताना एखादी गोष्ट अतिरंजीत स्वरुपात लिहीली गेली असेलही परंतु अस्तित्वात नसलेली, न घडलेली घटना लिहीने इतके सोपे नसते, त्यावर त्याकाळी व त्यानंतर काही वर्षात ही वाद झाला असताच ना , इतिहास घडतो, तो त्या त्या काळात आहे तसाच नोंदवला जातो, तो लादण्याचा वा बदलण्याचा कोणी प्रयत्न करु नये, इतिहास बदलल्यामुळे आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये वा सत्तेमध्ये काहीच बदल होणार नाही, हा जातीय वर्चस्वाचा वाद खरच थांबवावा, ज्यांनी आपले उभे आयुष्य शिवचरीत्रा वर खर्च घातले अशा थोर इतिहासकारांना खोटे ठरवुन राजकीय पाठबळावर इतिहास लादण्याचा वा बदलण्याचा कोणी प्रयत्न करु नये, त्याला विरोध होतच राहील.

  • Kiran म्हणतो आहे:

   एकदम बरोबर. काही मराठा नेत्यांना आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी समाजात फुट पाडणे आवश्यक आहे. वास्तविक बहुजन समाजावर सर्वाधिक अत्याचार मराठा समाजाने केलेत. जातीची बंधना आणि उच्च-नीच भेदभाव मराठा समाज कठोरपणे पाळतो. आणि गेली कित्येक वर्ष मराठा समाज सत्ता हस्तगत करून बसला आहे. पण स्वतःचं पितळ उघडं पडू नये म्हणून त्यांना ब्राम्हण-बहुजन समाजात दुरावा कायम ठेवण्याची आवशकता आहे. ह्याचा एक भाग म्हणून आता रामदास स्वामी, दादोजी अश्यांना लक्ष्य केले जात आहे.

 7. amar म्हणतो आहे:

  बरयाच दिवसापासून सत्य काय आहे ते शोधात होतो. आज ते नजरेसमोर आले. दादू कोंडदेव न शिक्षक, न गुरु ते फक्त शहाजी राजांनी नेमलेले एक प्रशासकीय अधिकारी होते हे स्पष्ट जाहले.

 8. हेरंब म्हणतो आहे:

  अच्छा अच्छा. हा ब्लॉग संभाजी ब्रिगेडच्या चिल्ल्यापिल्ल्यांचा आहे होय? बरं बरं.. चालू द्या.. मी माघार घेतो..
  ब्राह्मणद्वेषावर आधारलेल्या वैचारिक नपुंसक संघटनेच्या लोकांशी बोलण्यापेक्षा पांढरं निशाण फडकावणं उत्तम..

  • VIJAYKUMAR VINAYAK BHAWARI म्हणतो आहे:

   jaysingrao pawar & gajanan mehandale he doghehi tya tya patliwar mothe aahet …. hemant athalye yanni 29 august 2010 la kelele vidhan ethihacha ek vachak manun mala patlele nahi …. konatahi ethihasakar samor aalela purava pahunch tyawar vidhan karatho yas rajwade… sardesai… bedekar.. apwad nahit … krupya vidhan mage gyve namr vinanti….

 9. Mahesh Joshi म्हणतो आहे:

  I think . ya vadakade apan saglech Jatiyavadi paddhatine pahat ahot. Apan kamaliche vikrut ani tiraskarniy ahot. Shri Shiv Chhatrapatinchya Pavitra matit apan janmala aalo yachi janiv kuthe jate mahit nahi.

 10. Sanjay म्हणतो आहे:

  shivaji maharajavar ek Mahan chitrapat banvava. Bahubali tar kalpanik aahe.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s